HBD Disha Patani : दिशा पटानीला अभिनेत्री व्हायचे नव्हते, आज आपल्या हॉट आणि बोल्ड लूकने लावतेय सर्वांना वेड!

WhatsApp Group

HBD Disha Patani : आपल्या हॉट आणि बोल्ड स्टाईलने इंटरनेटचे तापमान वाढवणारी अभिनेत्री दिशा पटानी हिचा आज 30 वा वाढदिवस आहे. बर्थडे गर्ल (दिशा पटानी बर्थडे) बद्दल अशी रंजक माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जे वाचून तुम्ही देखील थक्क व्हाल. एक व्हिलन, एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी, मलंग, बागी 2 यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीत कमाई करणाऱ्या दिशाला अभिनेत्री बनायचे नव्हते.

सध्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असलेल्या दिशा पटानीला अभिनेत्री नव्हे तर पायलट व्हायचं होतं. पण नशिबाचे लिखाण कोणी टाळू शकत नाही, असे म्हणतात. त्यामुळेच आज दिशा अभिनय विश्वात पायलट नव्हे तर अभिनय विश्वात राज्य करते आहे. एका मुलाखतीत दिशाने सांगितले होते की, तिने मुंबईतील एका कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला होता आणि त्यानंतर तिचे नशीब बदलले.

तिला अनेक ऑडिशन्सचे कॉल येऊ लागले. दिशा मिस इंडिया इंदूर सौंदर्य स्पर्धेची उपविजेती देखील आहे. सलमान खानसोबतच्या ‘राधे’ चित्रपटानंतर ती लवकरच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ आणि ‘योधा’मध्ये दिसणार आहे.