वाढदिवसाच्या शुभेच्छा एबी डिव्हिलियर्स, जाणून घ्या डिव्हिलियर्सचे ‘हे’ खास विक्रम

WhatsApp Group

दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्स आज आपला ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे Happy Birthday AB de Villiers. एबीडी आणि मिस्टर 360 म्हणून ओळखल्या जाणार्‍या या दिग्गजाचा जन्म १७ फेब्रुवारी १९८४ रोजी दक्षिण आफ्रिकेत झाला.

एबी डिव्हिलियर्सने २०१८ मध्ये अचानक आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तर गेल्याच वर्षी त्याने आयपीएलमधून माघार घेतली होती. डिव्हिलियर्सने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ११४ कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने ५०.६६ च्या सरासरीने ८७६५ धावा केल्या. त्याच वेळी, २२८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५३.५० च्या सरासरीने त्याच्या बॅटमधून ९५७७ धावा आल्या, तर ७८ टी-२० सामन्यांमध्ये त्याने १६७२ धावा केल्या आहेत.


डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये 184 सामने खेळताना 39.71 च्या सरासरीने 5162 धावा केल्या आहेत. तसेच आयपीएलमध्ये त्याच्या नावावर ३ शतके आणि तब्बल ४० अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र यंदापासून डिव्हिलियर्स आयपीएल खेळताना दिसणार नाहीये.

एबी डिव्हिलियर्सच्या नावावर कसोटीत २२ आणि वनडेत २५ शतके आहेत. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विश्वविक्रमही एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहे. 2015 मध्ये एबीने वनडेमध्ये 31 चेंडूंमध्ये शतक झळकावत हा पराक्रम आपल्या नावावर केला होता. त्याने या विश्वविक्रमी खेळीत ८ चौकार आणि १० षटकार मारले.