अनंत चतुर्दशी चा दिवस गणपती विसर्जनाचा दिवस म्हणूनही ओळखला जातो. गणेश चतुर्थी ला बसवण्यात आलेले गणपती या दिवशी नदी, तलाव व समुद्राच्या पाण्यात विसर्जित केले जातात. या दिवशी सर्वकडे आनंदाचे वातावरण असते. गणपती बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात भक्त एकत्रित होतात. आजच्या या लेखात आम्ही आपल्या करिता अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत.
निरोप घेताना देवा आम्हास आज्ञा असावी
चुकले आमचे काही तर क्षमा करावी
आभाळ भरले होते तुम्ही येताना
आता डोळे भरलेत पाहून तुम्हाला जातांना
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या
तुझ्या येण्यान गणराया
घर माझं आनंदात नाहून जातं
अनंत चतुर्दशी चा निरोप तुला देतांना
मन माझं भरून येतं
अनंत चतुर्दशीच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा
विसर्जन तुमचं गणराया आनंदाने करतो मी
काही कमी पडलं तुझ्या सेवेत तर लेकरू समजून पदरात घ्या तुम्ही
अनंत चतुर्दशीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा
डोळ्यात आले आहेत अश्रू
बाप्पा आम्हास नका विसरु
आनंदमय करून चालले आहात तुम्ही
पुढच्या वर्षाची वाट पाहु आम्ही
गणपती बाप्पा मोरया
उज्ज्वल प्रभात उज्वल दिशा
पूर्ण होवो तुमच्या आशा
गणेश चरणी ही एकच इच्छा
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा
करून दूर अंधार
आली सकाळ घेऊन आनंद,
गणेशांची होईल सर्वांवर कृपा
आज आहे सर्वांवर त्यांचा आशीर्वाद
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा
ॐ नमस्ते गणपतये।
त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि
त्वमेव केवलं कर्ताऽसि
त्वमेव केवलं धर्ताऽसि
त्वमेव केवलं हर्ताऽसि
त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि
त्व साक्षादात्माऽसि नित्यम्
श्री गणेशांच्या भक्तीत विसरा सर्व दुःख
होऊन मग्न गणेश भक्तीत,
सारे गाऊया गणेशांचे गुण एकत्र
आजच्या या शुभ दिवशी
भगवान गणेशास प्रार्थना आहे की
त्यांची कृपादृष्टी सदैव तुम्हा व तुमच्या कुटुंबावर राहो.
अनंत चतुर्दशी च्या हार्दिक शुभेच्छा
करा कृपा मजवर गणेशा
संपूर्ण जीवन करतोय तुम्हास प्रणाम
जगात सर्वजण आपलेच गुण गात आहेत
प्रत्येक क्षणी आपल्या चरणी शिश नमवत आहेत