Happiness Quotes In Marathi – आनंद देणारे मराठी सुविचार

WhatsApp Group

ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे मराठी सुविचार Marathi Suvichar 100% आचरणात आणायला हवं.

1 विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही, केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.
2 समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी, समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.
3 भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
4 अपयशाने डगमगू नका व यशाने फुशारून जाऊ नका.
5 कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
6 संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं, त्याच्या हातात असतं.
7 विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
8 खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?
9 टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.
10 कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

 

प्रत्येक सुविचार हा व्यक्तिमत्त्व विकास आणि संस्कृती जपण्यासाठी अनमोल आहेत. किंबहुना सुविचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकार आहेत.

11 या जगात माणसाची नाही त्याच्या पैशांची किंमत असते…
12 या जगात तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम कराल तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त रडवेल…
13 माणूस व्हा साधू नाही झालात तरी चालेल, संत ही नाही झालात तरी चालेल, पण माणूस व्हा माणूस…
14 पुस्तकांनी मनाचा विकास साधतो.
15 खरा मित्र आपली पुस्तके होय.
16 पशुंना धनाची इच्छा नसते पण तीच इच्छा माणसाला पशु बनवते.
17 सत्य हेच अंतिम समाधान असते.
18 कुणीही जन्मतः दुर्जन नसतो. पण त्याला दुर्जन बनवतो तो समाज.
19 पापी मनुष्याला सत्य हे सापासारखे दंश करत असते.
20 तुम्हाला कोणाचा मान करायचा नसेल तर करू नका. पण त्याचा अपमानही करू नका.

 

ज्या व्यक्तीचे विचार सुंदर असतात, त्यांना कुठेही कधीही पराभूत केले जात नाही, यश हे निश्चित आहे. अफाट कष्ट, कर्म आणि योग्य अनुभव ज्ञानाशिवाय कोणीही यश प्राप्त करू शकत नाही. यश मिळविण्यासाठी आपले मन आणि विचारही शुद्ध असले पाहिजे आहेत.

21 जगात तीच लोकं पुढे जातात जे सूर्याला जागे करतात आणि तीच लोकं पाठीमागे राहतात ज्यांना सूर्य जागं करतो…
22 दान देताना बघावे आपले दान योग्य वक्तिला देतो की नाही.
23 तुमच्या अंगी शौर्य नाही तर सांगण्यास घाबरू नका. इतरांना तेवढे ही धारीष्ट नसते.
24 अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
25 अंधारातच आहे उद्याचा उषःकाल.
26 आशा व निराशा या दोन्ही सख्या बहिणी आहेत. प्रत्येकाने ठरवायचे की आपण कोणाशी मैत्री करावी.
27 गर्वाने मित्र शत्रू बनतात.
28 रोपाला खतपाणी दिल्याने त्याचा वृक्ष बनतो. तसेच मुलावर संस्कार केले तर त्याचा विकास होतो.
29 आई, वडील, गुरुजन व देश यांच्यावर निष्ठा ठेवावलाच हवी.
30 एखाद्याचे तुम्ही भले करू शकत नसल्यास निदान त्याचे वाईट तरी चिंतू नका.

 

चांगले विचार मानवाला Motivation देतात आणि त्यांच्या यशाची पायरी बनून त्यांच्या जीवनात एक माध्यम, कॉफीडेन्स देतात. असे मानले जाते, की कर्म हे कर्मश्रेष्ठ आहे, जसे एखाद्या व्यक्तीने केलेले कर्म, तसेच त्याला हीच फळ मिळते. 

31 निसर्गाच्या पुढे प्रगतशिल माणूस खुजाच असतो.
32 खोटी ऐट व खोटा मान सोडा. आयुष्यात काही कमी पडणार नाही.
33 सुख हे पैशात नसून ते संतुष्टात असते.
34 पैशाने सर्वकाही घेता येते पण प्रेम पैशाने घेता येत नाही.
35 पैशाने माणूस पशू बनतो.
36 अंगात घातलेला कपडा किती उंची आहे याच्यापेक्षा किती स्वच्छ आहे हे महत्त्वाचे आहे.
37 कपडा मळला तरी धुता येतो पण अब्रूवर पडलेला दाग आपल्या मरणाबरोबर सुद्धा मिटत नाही.
38 आई, वडील ही परमेश्वराची देणगी आहे आणि ती फक्त एकदाच मिळते.
39 प्रेमाची तुलना सोन्याशी होत नाही.
40 प्रत्येकजण सर्वधर्मसमभाव वृत्तीने वागले तरच समाजाचे चित्र बदलता येईल.