
मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे फळांचा राजा आंबा भारताबाहेर विक्रीस गेला नव्हता. आंब्याला परदेशातून खूप मागणी असते परंतु कोरोनामुळे यात खंड पडला होता. सध्या अमेरिकेमध्ये आंब्याची निर्यात होत असल्याची माहिती मिळत आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर अमेरिकेमध्ये भारतीय आंब्याची निर्यात पुन्हा सुरू झाल्यामुळे, या आठवड्यात वॉशिंग्टन येथे होणाऱ्या आंबा महोत्सव कार्यक्रमात काही प्रसिद्ध जातींचे बॉक्स अमेरिकी प्रशासनाला भेट दिले जाण्याची शक्यता आहे.
मागच्या दोन वर्षांपासून देशात विवीध ठिकाणी पिकला जाणारा आंबा कोरोनामुळे परदेशात विकला गेला नव्हता. यामुळे यंदा आंब्यांची निर्यात परदेशात होणार असल्यामुळे आंब्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान उत्तम दर्जाचा आंबा निर्यात होणार असल्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. दोन वर्षांपासून असलेली निर्यांत बंदी उठवल्याचा फायदा होणार आहे.
Sindhudurg Amboli: दाट धुकं आणि पाऊस…. आंबोलीत आल्हाददायक वातावरण
दरम्यान इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, हे आंबे पुण्यातील रेनबो इंटरनॅशनल या निर्यातदाराकडून निर्यात होणार आहेत. अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये महाराष्ट्रातील केसर, हापूस, गोवा मानकूर तसेच आंध्र प्रदेशातील हिमायत आणि बैगनपल्ली या पाच वाणांची खरेदी करण्यात आली आहे. असं रेनबो इंटरनॅशनलचे संचालक ए. सी. भासले यांनी इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली.