SSC Board Exam 2023: दहावी बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र आजपासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. दहावीच्या परीक्षा 2 मार्च ते 25 मार्चदरम्यान होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रात काही दुरुस्ती करायची असल्यास भरपूर वेळ मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षा SSC परीक्षेचे हॉल तिकीट आजपासून ( 6 फेब्रुवारी) दुपारी तीन वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ही माहिती देण्यात आली आहे. राज्यातील सर्व माध्यमिक शाळांनी दहावी बोर्ड परीक्षेसाठी फॉर्म भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना हॉल तिकीट प्रिंट करुन देण्याच्या सूचना शिक्षण मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.
