Kolhapur Rain : अर्ध्या तासाच्या पावसाने कोल्हापूरकरांची उडाली दाणादाण, ‘या’ जिल्ह्यालाही पावसाने झोडपले

Kolhapur Rain : हवामान खात्याच्या अंदाजानुसार (IMD ALERT) राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान कोल्हापूर, बेळगाव, सांगली, या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.
दुपारच्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Rain) चंदगड, आजरा गडहिंग्लज तालुक्यामध्ये पावसाला सुरूवात झाली होती. गोव्याच्या सीमेवरून आलेल्या पावसाने कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला धडकी भरावी एवढ्या जोरात मान्सून पूर्व पावसाने (pre monsoon rain) हजेरी लावली. दरम्यान याबाबत कोल्हापूर जिल्हा आपत्ती विभागाकडून माहिती देण्यात आली होती.
सायंकाळी फक्त ३० मिनिटे पडलेल्या पावसामुळे अक्षरश: लोकांची दैना उडाली. पावसाची भयानकता इतकी होती फक्त 30 मिनिटात पाणी पाणी झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक घरांची छप्पर उडून गेली तर पत्र्याचे शेड उद्ध्वस्त झाले. शहरातील जयंती नाल्याच्या शेजारी खानविलकर पंपाजवळ भले मोठे झाड कोसळल्यामुळे शहरातील मुख्य रस्ता असल्याने काही काळ वाहतूक खोळांबली होती.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील फॉलो करा. insidemarathi.com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या