केस गळती ही समस्या काही नवीन नाही. बदलते हवामान, तणाव यामुळे देखील केस गळतीची समस्या होऊ लागते. केस गळती रोखण्यासाठी आपण विविध उत्पादने वापरत असतो त्यावर अनेक पैसे खर्च करुन देखील ही समस्या काही कमी होत नाही.
ड्राय फ्रूट्स
केस चमकदार आणि मजबूत ठेवण्यासाठी ड्रायफ्रुट्स आणि नट्सचे सेवन देखील केले पाहिजे. ते खाल्ल्यानं केसांच्या मुळांना पोषण मिळतं. त्यामुळे केस आणखीन मजबूत होतात. यामध्ये झिंक मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे केस मजबूत होतात.
राजमा
राजमा हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. अशा परिस्थितीत भरपूर राजमा खाणं आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हे केसांसाठी विशेषतः चांगलं ठरतं. राजमामध्ये व्हिटॅमिन सी, फॉलिक अॅसिड, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, फायबर आणि प्रोटीनसारखे पोषक तत्त्वं असतात, जे केस मजबूत करण्यासाठी प्रभावी ठरतात.
फळ आणि भाज्या
केस निरोगी, चमकदार आणि मजबूत ठेवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या आणि फळं खाणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये बीट, पालक आणि बेरी यांचा समावेश करू शकता.
कडुलिंब
कडुलिंब हे औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. केसगळती रोखण्यासाठी मास्क म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो. ते बनवण्यासाठी कडुलिंबाची पाने उकळवा आणि नंतर त्याची पेस्ट बनवा. शॅम्पू केल्यानंतर पेस्ट लावा. काही वेळाने केस धुवा. आठवड्यातून दोनदा याचा वापर करावा.