राज्यात कोकणात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गारांसह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. लांजा , रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण ,गुहागर तालुक्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळला आहे.
या पावसाच्या जोरदार आगमनाने नागरिकांची धांदल झाली. चिपळूण गुहागर, संगमेश्वर, या ठिकाणी गारांसह पाऊस झाला. सुसाट्याचा वारा सुरु असल्यामुळे झाडे उन्मळून पडली. वीज पुरवठा खंडित झाला आहे. अचानक गारांसह आलेल्या या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलेले होते.
त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सुसाट वाऱ्यामुळे काही झाडे उन्मळून विजेच्या वाहिन्यांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झालाआहे. त्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. राज्यात कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. येत्या पुढील 4 दिवस राज्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.