
वारासणीमधील ज्ञानवापी मशिदीचे चित्रीकरणाद्वारे सर्वेक्षण रविवारी शांततेमध्ये पूर्ण झाले. सर्वेक्षणाचा आजचा दुसरा दिवस असून उर्वरित कामही आज पूर्ण झाले आहे. रविवारपर्यंत ६५ टक्के आणि उर्वरित सर्वेक्षण आज म्हणजेच सोमवार, १६ मे रोजी पूर्ण झाले आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार हे कामकाज सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडल्याचा दावा न्यायालयामध्ये हिंदूंची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी केला आहे.
या सर्वेक्षणासंदर्भात एका वृत्तवाहिनीशी बोलताना या प्रकरणामध्ये हिंदूंची बाजू मांडणारे वकील विष्णू जैन यांनी मोठा दावा केलाय. फोनवरुन दिलेल्या माहितीमध्ये विष्णू जैन यांनी मशिदीच्या परिसरामध्ये असणाऱ्या विहिरीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा केला आहे. या शिवलिंगाच्या संरक्षण आणि जतन केले जावे या मागणीसाठी आपण स्थानिक न्यायालयामध्ये अर्ज करणार असल्याचेही जैन म्हणाले आहेत.
जैन यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हे शिवलिंग १२ फूटांचे असल्याची माहिती देण्यात आली आहे. हिंदूंची बाजू मांडणारे दुसरे वकील मदन मोहन यादव यांनी हे शिवलिंग म्हणजे नंदीचा चेहरा असल्याचा दावा केला आहे.