
Gururaj Pujari Wins Bronze : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला दुसरे पदक मिळाले आहे. गुरुराज पुजारीने वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. गुरुराज पुजारीने पुरुषांच्या 61 किलो ग्रॅम वजनी गटात कांस्यपदक जिंकले. राष्ट्रकुल 2022 मधील भारताचे हे दुसरे पदक आहे.
या सामन्यात मलेशियाच्या मोहम्मद अंजीलने सुवर्णपदक पटकावले. तर रौप्य पदक पापुआ न्यू गिनीच्या मोरे बायूने पटकावले. भारताचा गुरुराज पुजारी कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला. गुरुराज पुजारीने केवळ 269 किलो वजन उचलून पदक जिंकले. पुजारीने स्नॅचमध्ये 118 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 151 किलो वजन उचलले. सलग दुसऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकण्यात पुजारीला यश आले.
Team India wins its second Medal. Congratulations Gururaja Poojary on winning the 🥉 in weightlifting 🏋️♀️ in the 61 KG category. #Ekindiateamindia #B2022 pic.twitter.com/SIWhkyINyQ
— Team India (@WeAreTeamIndia) July 30, 2022
29 वर्षीय गुरुराज पुजारीचे राष्ट्रकुल स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. 2018 च्या गोल्ड कोस्ट गेम्समध्येही गुरुराजने रौप्यपदक जिंकले होते.
भारताला झोळीत दुसरे पदक
याआधी संकेत सरगरने भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. संकेतने चमकदार कामगिरी करत वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक पटकावले. संकेतने 55 किलो वेटलिफ्टिंग इलेव्हनमध्ये ही कामगिरी केली. संकेतने स्नॅचमध्ये 113 किलो वजन उचलले. क्लीन अँड जर्कमध्ये 135 किलो वजन उचलताना. मलेशियाच्या बिन कासदान मोहम्मदने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. क्लीन अँड जर्कमध्ये त्याने 142 किलो वजन उचलले.