
Guru Purnima 2022 Wishes in Marathi: आज (बुधवारी 13) जुलै रोजी गुरुपौर्णिमा (Guru Purnima 2022) साजरी केली जात आहे. गुरुपौर्णिमा हा दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार वेदांचे रचनाकार महर्षी वेद व्यास यांचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यास जयंतीही साजरी केली जाते. गुरूला देवाचा दर्जा दिला जातो.
जीवनात पहिला गुरू आई असते (Parents Guru Purnima Quotes) असेही मानले जाते. त्यामुळे या दिवशी आईला देखील शुभेच्छा देऊ शकता. तसेच आयुष्याला वळण लावणारे, आपल्याला शिकवून ज्ञानी करणारे आणि सतत वेगवेगळ्या वळणावर मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरुसमान व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. या लेखात आम्ही तुम्हाला काही शुभेच्छा संदेश दिले आहेत. ते पाठवून तुम्ही तुमच्या गुरुंना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देऊ शकता आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार माणू शकता.
- गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक.. आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना, आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन ,गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
- जे जे आपणासी ठावे, ते दुसऱ्यासी देई, शहाणे करून सोडी सकळ जना तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा.. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
- गुरुब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ,गुरुरेव परंब्रह्म ,तस्मै श्रीगुरुवे नमः ।।
- प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक टप्प्यावर क्षणा-क्षणाला भेटलेल्या आणि भेटणाऱ्या त्या माझ्या असंख्य गुरुंना शतशः वंदन !
- हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा. आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा… गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Guru Purnima 2022: गुरुपौर्णिमेच्या दिवशी करा हे 6 उपाय! रखडलेली कामे पूर्ण होतील
- गुरु म्हणजे ….. कोळशातून सोने निर्माण करणारी खाण चिखलातून मूर्ती घडविणारा मूर्तीकार दगडातून शिल्प तयार करणारा शिल्पकार आणि वेळप्रसंगी आईबापापरी बनणारा आधार गुरू पौर्णिमेच्या आपणास हार्दिक शुभेच्छा
- सर्व प्रथम शुभेच्छा तिला ‘जिने मला घडवलं, जिच्यामुळे आज मी आहे माझ्या आयुष्यातील पहिली गुरू प्रिय आई गुरु पोर्णिमानिमित्त वंदन आणि खूप खूप शुभेच्छा
- जगासाठी आपण कदाचित एक शिक्षक असाल परंतु आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक नायक आहात! देवाचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतील.गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा
- आई माझी गुरू, आई कल्पतरू, आई माझी प्रीतीचे माहेर, मांगल्याचे सार, सर्वाना सुखदा पावे.. अशी आरोग्य संपदा, कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असु नये, गुरु पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
- गुरु शिवाय नाही होत जीवन साकार डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात, तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार माझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद आणि ज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल गुरूंचे खूप खूप आभार. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा