
IPL 2022 चा 51 वा सामना शुक्रवारी गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. गुजरातने या स्पर्धेत आतापर्यंत 10 सामने खेळले असून 8 जिंकले आहेत. तर दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत आणि फक्त 1 जिंकला आहे. गुणतालिकेमध्ये गुजरातचा संघ अव्वलस्थानी आहे, तर मुंबईचा संघ शेवटच्या म्हणजे दहाव्या स्थानावर आहे.
ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी चांगली आहे आणि फलंदाजीसाठी अनुकूल आहे. मात्र खेळपट्टीवर जसजसा खेळ पुढे जाईल तसतशी खेळपट्टी गोलंदाजांनाही मदत करेल आणि फिरकी गोलंदाजांनाही मदत होईल. येथे नाणेफेक जिंकून दुसऱ्यांदा फलंदाजी करणे हा संघासाठी चांगला निर्णय ठरू शकतो.
गुजरात टायटन्सचा संघ – शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, प्रदीप सांगवान/यश दयाल.
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), टीम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, हृतिक शोकीन, डॅनियल सॅम्स, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ, जसप्रीत बुमराह.