IPL 2022: पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात-राजस्थान भिडणार, फायनलचे तिकीट कोणाला मिळणार?

WhatsApp Group

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चा पहिला क्वालिफायर सामना गुणतालिकेत पहिल्या क्रमांकाचा संघ गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेला राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघ यांच्यात खेळला जाईल. हार्दीक पांड्या (Hardik Pandya) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) यांना आयपीएलच्या 15व्या हंगामाच्या अंतिम फेरीत थेट प्रवेश मिळवण्यासाठी हा सामना जिंकण्याची संधी आहे. मात्र पराभूत संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळविण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.

आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्स (GT) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यातील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर (Eden Gardens, Kolkata) 24 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. या सामन्याची नाणेफक संध्याकाळी सात वाजता होईल, या क्वालिफायर सामन्याचे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. डिस्ने हॉटस्टारवर तुम्ही लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. IPL च्या साखळी सामन्यांमध्ये गुजरात टायटन्सने 14 पैकी 10 सामने जिंकले आहेत तर राजस्थानने 14 पैकी 9 सामने जिंकले.

गुजरात टायटन्सचा संघ – शुभमन गिल, साई सुदर्शन, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, रिद्धिमान साहा, हार्दिक पंड्या (कर्णधार), डॉमिनिक ड्रेक्स, विजय शंकर, जयंत यादव, गुरकीरत सिंग मान, राहुल तेवतिया, रशीद खान, वरुण आरोन, यशकंडे, यशवंत यादव. दयाल, प्रदीप सांगवान, अल्झारी जोसेफ, रवी श्रीनिवासन, साई किशोर, नूर अहमद, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, रहमानउल्ला गुरबाज

राजस्थान रॉयल्सचा संघ – जोस बटलर, करुण नायर, रस्सी व्हॅन डर डुसेन, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार),  ध्रुव जुरेल, अनुय सिंग, जेम्स नीशम, डॅरिल मिशेल, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, शुभम गढवाल, कुलदीप गढवाल नॅथन कुल्टर-नाईल, नवदीप सैनी, कुलदीप सेन, ओबेद मॅककॉय, तेजस बरोका, केसी करिअप्पा, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंट बोल्ट, कॉर्बिन बॉश