IPL 2022: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सचा संघ आयपीएलसाठी सज्ज

WhatsApp Group

गुजरात टायटन्स Gujarat Titans प्रथमच IPL मध्ये सहभागी होणार आहे. गेल्या वर्षी, सीव्हीसी कॅपिटल्सने गुजरात टायटन्सची फ्रेंचायझी 5625 कोटी रुपयांना विकत घेतली होती. सीव्हीसीने लिलाव प्रक्रियेत अदानी समूह आणि इतर स्पर्धकांना मागे सारत हा संघ खरेदी केला आहे.

आयपीएलच्या १५व्या आवृत्तीत गुजरात संघाने फ्रँचायझीने हार्दिक पांड्या, रशीद खान आणि शुभमन गिल या तीन खेळाडूंना संघात घेतले होते. यासोबतच फ्रँचायझीने हार्दिकला hardik pandya संघाचा कर्णधार बनवले आहे. मग फ्रँचायझीने मेगा लिलावात लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, राहुल टिओटिया यांच्यासारख्या खेळांडूना विकत घेतले आहे.

अहमदाबाद संघाने यापूर्वीच आपल्या कोचिंग स्टाफची निवड केली आहे. संघाचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा असेल तर इंग्लंडचा माजी सलामीवीर विक्रम सोलंकी यांना संघाचे संचालक बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन हे संघाचे मार्गदर्शक असतील.

गुजरात टायटन्सची गोलंदाजी खूपच मजबूत दिसत आहे, ज्यामध्ये काही मोठ्या नावांचा समावेश आहे. पण फलंदाजीत तेवढी ताकद दिसत नाही. जेसन रॉयच्या बाहेर पडल्यानंतर आता रहमानउल्ला गुरबाजला संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी असेल.

गुजरात टायटन्सला पदार्पणाच्या मोसमात विजेतेपद मिळवण्यासाठी तिन्ही विभागात चांगली कामगिरी करावी लागणार आहे. गुजरात टायटन्सचा संघ 28 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्याने आयपीएलमध्ये पदार्पण करेल. विशेष म्हणजे हा सामना लखनऊ सुपर जायंट्सचाही पदार्पण सामना असणार आहे.

आयपीएल २०२२ साठी असा आहे गुजरात टायटन्सचा संघ Gujarat Titans squad

हार्दिक पांड्या (15 करोड)
राशिद खान (15 करोड)
शुभमन गिल (8 करोड)
मोहम्मद शमी (6.25 करोड)
रहमानउल्ला गुरबाजला (2 करोड)
लोकी फर्ग्यूसन (10 करोड)
अभिनव सदरंगानी (2.6 करोड)
राहुल तेवतिया (9 करोड़ रुपये)
नूर अहमद (30 लाख)
आर साई किशोर (3 करोड)
डोमिनिक ड्रेक्स (1.10 करोड)
जयंत यादव (1.70 करोड)
विजय शंकर (1.40 करोड)
दर्शन नालकांडे (20 लाख )
यश दयाल (3.2 करोड)
अल्जारी जोसेफ (2.40 करोड)
प्रदीप सांगवान (20 लाख )
डेविड मिलर (3 करोड़ )
रिद्धिमान साहा (1.90 करोड)
मैथ्यू वेड (2.40 करोड)
गुरकीरत सिंह (50 लाख )
साई सुदर्शन (20 लाख )
वरुण एरॉन (50 लाख)

महत्वाच्या बातम्या 

ठाकरेंच्या कुटुंबापर्यंत पोहोचली ED: उद्धव ठाकरेंच्या मेहुण्यांच्या कंपनीचे 6.5 कोटी किमतीचे 11 फ्लॅट सील, मनी लाँड्रिंगचा संशय

IPL: अमित मिश्राच्या नावावर सर्वाधिक हॅट्रिक्स, दुसऱ्या स्थानी आहे युवराज सिंग!

जाणून घ्या आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणाऱ्या 3 खेळाडूंबद्दल

धान उत्पादक शेतकऱ्यांचे शिल्लक ६०० कोटी तत्काळ वितरित करणार, अजित पवारांची विधानसभेत माहिती