IPL 2023 च्या शेवटच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 6 विकेट्सने पराभव केला. बंगळुरूच्या पराभवाने त्यांचे प्लेऑफचे स्वप्न भंगले. गुजरातच्या विजयासह मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 198 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात गुजरातने शुभमन गिलच्या नाबाद शतकाच्या जोरावर विजय मिळवला. गिलच्या आधी विराट कोहलीनेही नाबाद शतक झळकावले.
गुजरातकडून शुभमन गिल आणि विजय शंकर यांनी शानदार फलंदाजी केली. विजय शंकर 35 चेंडूत 53 धावा करून बाद झाला. त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. तत्पूर्वी, सलामीवीर ऋद्धिमान साहा अवघ्या 12 धावा करून बाद झाला. दासून शनाकाला खातेही उघडता आले नाही. त्याला हर्षल पटेलने शून्यावर बाद केले. डेव्हिड मिलर 7 चेंडूत 6 धावा करून बाद झाला.
Mumbai Indians have Qualified for the Playoffs 2023💙🥁
Here we comes 😎🔥#IPLPlayOffs #MumbaiIndians pic.twitter.com/i3I3HrMSWr
— Mumbai Indians FC (@MIPaltanFamily) May 21, 2023
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 5 गडी गमावून 197 धावा केल्या. यादरम्यान कोहली आणि कॅप्टन डू प्लेसिस सलामीला आले. डुप्लेसिस 19 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. तर कोहली शेवटपर्यंत टिकून राहिला. त्याने 61 चेंडूंचा सामना करत नाबाद 101 धावा केल्या. कोहलीने 13 चौकार आणि 1 षटकारही लगावला. याशिवाय ग्लेन मॅक्सवेलने 5 चेंडूत 11 धावा केल्या. महिपाल लोमरर 1 धावा करून बाद झाला. ब्रेस्लेने 26 धावांचे योगदान दिले. अनुज रावत 23 धावा करून नाबाद राहिला.
Mumbai Indians have Qualified for the Playoffs 2023💙🥁
Here we comes 😎🔥#IPLPlayOffs #MumbaiIndians pic.twitter.com/i3I3HrMSWr
— Mumbai Indians FC (@MIPaltanFamily) May 21, 2023
गुजरातला पहिले यश नूर अहमदने दिले. त्याने कोहली आणि डुप्लेसिसची जोडी फोडली. नूरने 4 षटकात 39 धावा देत 2 बळी घेतले. मोहम्मद शमीने 4 षटकात 39 धावा देत एक विकेट घेतली. यश दयालने 4 षटकात 39 धावा देत एक विकेट घेतली. राशिद खानने 4 षटकात 24 धावा देत एक विकेट घेतली. मोहित शर्माला एकही यश मिळाले नाही.