
Gujrat Heroin : गुजरातमध्ये 9 हजार कोटींचं हेरोईन जप्तगुजरातमधील कच्छ जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. कच्छ जिल्ह्यातील किनारी भागामध्ये एका खाडीतून जप्त केलेल्या बॅगमध्ये 250 कोटी रुपयांचे हेरॉइन सापडलं आहे. एटीएसनं (ATS) सोमवारी यासंदर्भात माहिती दिली आहे. हे हेरॉईन पाकिस्तान तस्करांकडून फेकण्यात आलं असल्याचं एटीएसकडून सांगण्यात आलं आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) आणि पोलिसांनी रविवारी जखाऊ जवळ 49 बॅग जप्त केल्या होत्या. याआधी 30 मे रोजी तटरक्षक दल आणि एटीएसनं अरबी समुद्रातून भारतीय सीमेअंतर्गत सात पाकिस्तानी नागरिकांना अटक केली होती.
गुजरात एटीएसचे पोलीस उपअधीक्षक बी. पी. रोझिया यांनी सांगितलं की, ‘गुजरातमध्ये अंमली पदार्थाची तस्करी करण्याच्या योजना आखत असलेल्या तस्करांसंबंधित मिळालेच्या सूचनेवरून, बोटीचा कॅप्टन मोहम्मद अक्रम याने तटरक्षक दलाचे जहाज जवळ येत असल्याचे पाहून दोन पिशव्या समुद्रामध्ये फेकून दिल्या. तटरक्षक दल आणि एटीएसने 30 मे रोजी अल नोमान या पाकिस्तानी बोटीला सात जणांसह पकडलं होतं. रोजिया यांनी सांगितलं की, फॉरेन्सिक विश्लेषणातून असं दिसून आलं आहे की, 49 बॅगमध्ये सुमारे 50 किलो हेरॉईन होतं. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 250 कोटी रुपये आहे.’