
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे. आतापर्यंतच्या मिळालेल्या माहितीनुसार भाजप 150 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. भाजपच्या एवढ्या मोठ्या विजयाने राजकीय विश्लेषकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाही भाजपला एवढा मोठा विजय नोंदवता आला नव्हता.
2001 मध्ये अंतर्गत उलथापालथीनंतर भाजपने नरेंद्र मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री केले. मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर पुढच्याच वर्षी 2002 मध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजपने 127 जागा जिंकल्या. 1990 नंतर पक्षाचा हा सर्वात मोठा विजय होता. 1998 मध्ये भाजपला 117 जागा मिळाल्या होत्या.