गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. महाराष्ट्रासोबतच गुढीपाडवा दाक्षिणात्य राज्यात आणि गोव्यातही उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळे या दिवशी उत्साहात असतात. गुढीपाडव्याच्या निमित्ताने दिले जाणाऱ्या शुभेच्छा म्हणजेच गुढीपाडवा एसएमएस (आणि गुढीपाडवा स्टेटस (Gudi Padwa Status In Marathi) पाहणार आहोत. Gudi Padwa Wishes In Marathi
आपल्या परिवाराला हक्काने शुभेच्छा द्या या शुभ सणाच्या निमित्ताने आणि साजरा करा नववर्षाचा जल्लोष.
नवीन पल्लवी वृषलतांची, नवीन आशा नववर्षाची, चंद्रकोरही नवीन दिसते, नवीन घडी ही आनंदाची, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
नव्या संकल्पांनी करूया नववर्षाचा शुभारंभ, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
नववर्षाभिनंदन आईबाबा आणि आजीआजोबा.
नूतन वर्ष आणि गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
नवंवर्ष नवा हर्ष….नवा जोश नवा उत्कर्ष…..नववर्षाभिनंदन.
नव्या वर्षात आपल्या सर्वांच्या स्वप्नांना मिळो नवी भरारी, आयुष्याला लाभो तेजोमयी किनार, हीच सदिच्छा…नववर्षाच्या निमित्ताने आज !
नववर्षाची सुरूवात होवो न्यारी..सुखसमृद्धीने सजो आपली गुढी..हीच शुभेच्छा आहे आज माझ्या मनी
आयुष्याची गोडी वाढवणारा चैत्र आला चला करू पुन्हा नव्याने सुरूवात एका चैतन्याच्या अध्यायाला..गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.
Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याला हे काम अवश्य करा, सुख-समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभेल
पडता दारी पाऊल गुढीचे, आनंदी आणि मांगल्यमय होई जग सारे, या सणाला करू आनंदाचा जल्लोष कारण आले आहे हिंदू नववर्ष
पाडव्याची नवी पहाट, घेऊन येवा तुमच्या आयुष्यात सुखाची लाट, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
सण आला सौख्याचा पण काळजी घ्या
सण आणि शुभेच्छा देण्याच्या नादात
कोरोनाची करू नका साथ
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
नववर्ष आला आता आपला फळांचा राजा पण येणार
मग तयार व्हा आणि नववर्षात ताव मारायला
नववर्षाच्या आंबामय शुभेच्छा
वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष
सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष
नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा
यंदाही दिली नाही कोरोनाने भेटीची परवानगी
लांब राहून आपणही करूया त्याची रवानगी
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
लांब असू आपण या वर्षीही नाही होणार गाठीभेटी
तरी गुढी उभारताना आईबाबा नक्कीच होईल इमोशनल तुमची बेटी
मिस यू आईबाबा…गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
इंग्रजी नववर्षाच्या सुरूवातीला शुभेच्छा देण्यापेक्षा हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देणं जास्त महत्त्वाचं आहे.
नवी सकाळ, नवी उमेद, नवे संकल्प, नवा आनंद..तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गुडी पाडव्याच्या शुभेच्छा
चारी दिशांना आनंदाची आहे बहार..गोड श्रीखंड आणि पुरीचा आहे स्वाद..दारी सजली आहे रांगोळी..आसमंतात आहे पतंगाची रांग..नववर्ष तुम्हा-आम्हाला जावो समाधानाचं
आनंद होवो ओव्हरफ्लो..मस्ती कधीही न होवो लो..धनधान्याचा होवो वर्षाव..असं जाओ तुम्हाला नववर्षाचं पर्व
ऋतूने बदलतं हिंदू वर्ष..नवं वर्ष येताच येते बहार..सगळीकडे दिसतो हा सुंदर बदल..असं असतं नववर्षाचं हे पर्व
तुम्हाला मिळो गणपतीचा आशिर्वाद..विद्या मिळो सरस्वतीकडून..धन मिळो लक्ष्मीकडून..प्रेम मिळो सगळ्यांकडून..पूर्ण होवो प्रत्येक इच्छा..हॅपी गुडीपाडवा.
दिवस उगवतो दिवस मावळतो वर्ष येतं वर्ष जातं पण प्रेमाचे बंध कायम रहातात, आपलं नातं असं दरवर्षी वृद्धिंगत व्हावं हीच सदिच्छा, सर्वांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
गुढी उभारली असेल आज तुमच्याही दारी, चैतन्य आहे आज सर्वदारी…चला उत्साहाने साजरा करू नववर्षाचा हा आनंदोत्सव…शुभ गुढीपाडवा.
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
आशा-आकांक्षांचे बांधून तोरण..समृद्धीची गुढी उभारू द्वारी. गुढीपाडव्याच्या आणि नववर्ष पर्वाच्या हार्दीक शुभेच्छा.
आयुष्य एका स्वप्नासारखे जगावे..प्रत्येक संवेदनेला जगून पाहावे..नववर्षाची नवी पहाट अनुभवताना..आपल्या सर्वांना मिळो नवी वाट..हॅपी गुढीपाडवा
जुन्या गोष्टी मागे सोडून, स्वागत करूया नववर्षाचे, प्रगतीने आणि उत्साहाने भरलेले असो..तुमचे नववर्ष हे येणारे
सण आला दारी, घेऊन शुभेच्छांची वारी, तुम्हाला जाओ नववर्ष छान, गुढीपाडवाच्या शुभेच्छा.
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणं घेऊन आली सोनेरी दिवस, आला नववर्षाचा सण घेऊन आला सोनेरी भरारी. नववर्षाभिनंदन.
नववर्षाच्या आरंभाने होईल जुन्याचा नायनाट
अशीच सगळ्यांनी मिळून लावू कोरोनाची विल्हेवाट
यंदा उभारूया मास्कची गुढी
दूर करूया मनातली जुनी अढी
तुम्हा सर्वांना नववर्षाभिनंदन
वडिलधाऱ्यांचा करा सन्मान..लहान्यांना द्या प्रेम..याच संकल्पाने करा नववर्षाचा जल्लोष
आली आहे बहार नाचूया गाऊया..एकत्र येऊन आनंद साजरा करूया..निसर्गाची किमया अनुभवूया..एकमेंकाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊया.
निळ्या आभाळात शोभते उंच गुढी..नववर्ष आले घेऊन आनंदाची गोडी..गुढीपाडव्याच्या लाखलाख शुभेच्छा.