दही, लस्सी, पीठ, डाळवरील जीएसटी मागे; निर्मला सीतारमण यांची घोषणा

WhatsApp Group

नवी दिल्ली: विना पॅकिंग किंवा विना लेबल असलेल्या दाळ, पीठ, तांदूळ, ओट्स, रवा किंवा दही, लस्सी यांची विक्री होत असेल तर त्यावर जीएसटी लावण्यात येणार नसल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.

निर्मला सीतारमण यांनी ट्विटरच्या माध्यमातून ज्या खाद्यपदार्थांवर जीएसटी लावण्यात येणार नाही त्याची यादी देखील दिली आहे. जर हेच पदार्थ ब्रॅन्डेड किंवा पॅकड् असतील तर त्यावर पाच टक्के जीएसटी लावण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे.