ठाणे: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
देशातील पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचा वारसा जपून आजच्या महिलांनी विविध क्षेत्रात आणखी भरारी मारावी, हेच सावित्रीबाई फुले यांना खरे अभिवादन असेल, अशा शब्दात मुख्यमंत्री महोदयांनी अभिवादन केले. यावेळी तहसीलदार राजाराम तवटे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणाऱ्या थोर समाज सुधारक आणि पहिल्या शिक्षिका #ज्ञानज्योती #सावित्रीबाई_फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्रतापूर्वक अभिवादन केले.#महिला_शिक्षण_दिन pic.twitter.com/Q2rS5yHeyY
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 3, 2023