
मुंबई – महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने (Maharashtra Education Board) राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कांत 15 टक्के सवलत (School fee Reduction) देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात कोरोना काळात म्हणजेच वर्ष 2021 मध्ये शिक्षण विभागाने जाहीर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये 15 टक्के सवलती देण्याचा निर्णय घेतला होता. आता त्या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. शिक्षण विभागाने निर्णय दिल्यानंतर देखील राज्यातील अनेक शाळांना त्याची अंमलबजावणी केलेली नव्हती. त्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे आता शिक्षण विभागाने पुन्हा परिपत्रक काढले आहे.
शिक्षण विभागाने आपल्या परिपत्रकामध्ये म्हटले आहे, की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात 15 टक्के कपात करण्यात आली होती. परंतु काही शाळांनी अद्याप निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. या संदर्भात बहुतांश पालकांच्या तक्रारी देखील आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या पालकांकडून आकारण्यात आलेली 15 टक्के फी परत करा, नाही तर ती पुढील वर्षाच्या फीमध्ये समाविष्ट करा, असे आदेश राज्य शिक्षण विभागाने म्हटले आहे.