Maharashtra Board Results 2024: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावी-बारावीचा निकाल ‘या’ दिवशी लागणार

0
WhatsApp Group

Maharashtra Board Results 2024: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांचे पुढील नियोजन सुरू होते. कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा याची परीक्षाही सुरू होते. दहावी-बारावीचा निकाल लवकरच लागणार आहे. सध्या दहावी आणि बारावीचे विद्यार्थी सुट्टीचा आनंद घेत आहेत. दरम्यान, एक अपडेट समोर आले आहे. बारावीच्या निकालाचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले असून अवघ्या महिनाभरात बारावीचा निकाल विद्यार्थ्यांच्या हाती लागणार आहे.

दरम्यान, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. 12वीचा निकाल 25 मे पूर्वी तर 10वीचा निकाल 6 जूनपूर्वी जाहीर होईल. बारावीचा निकाल जाहीर होण्यास महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक असल्याचे समोर आले आहे. याशिवाय परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलैमध्ये घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – टी-20 विश्वचषकसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर, हा खेळाडू सांभाळणार संघाची धुरा!