सर्वोत्तम मराठी सुविचार संग्रह…

WhatsApp Group

आयुष्य जगत असताना सोबतीला फक्त विचार असुन चालत नाही. तर ते विचार सुंदर अर्थात सुविचार असावे लागतात. ज्याच्या जवळ सुंदर विचार आहेत तो कधीही एकटा नसतो. आज आपण असेच काही सुंदर सुविचार वाचणार आहोत.

  • माणसाने नेहमी असा विचार करू नये की तो त्याच्या आयुष्यात किती आनंदी आहे. त्यापेक्षा त्या व्यक्तीमुळे इतरांना किती आनंद होतो याचा विचार करायला हवा.
  • जोपर्यंत आपण कोणतेही काम करण्याचा प्रयत्न करत नाही, जोपर्यंत आपल्याला ते काम अशक्य वाटतं.
  • ध्येयात यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्वाचे आहे.
  • माणसाने नेहमी सावली आणि आरशा सारखी मैत्री करावी. कारण सावली तुमची साथ कधीच सोडत नाही आणि आरसा कधीही खोटं बोलत नाही.
  • जर एखादी व्यक्ती गरजेच्या वेळीच तुमची आठवण काढत असेल तर त्याबद्दल वाईट विचार करू नका, कारण अंधार पडल्यावरच दिव्याचीच आठवण येते.
  • प्रेम हा असा अनुभव आहे जो माणसाला कधीही हार मानू देत नाही. आणि द्वेष हा असा अनुभव आहे जो माणसाला कधीही जिंकू देत नाही.
  • शहाणा माणूस स्वतः चुका करत नाही, उलट, तो इतरांच्या चुकांमधून सर्व काही शिकतो.

चांगले विचार ही सर्वात मोठी शक्ती असून ज्या माणसांकडे चांगल्या विचारांचा पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत कधीच भक्कमपणे उभी राहू शकत नाही.

  • माणसाने नेहमी संधी शोधू नये, कारण आज जी आहे ती उत्तम संधी आहे.
  • चुकीच्या मार्गाने यशस्वी होण्यापेक्षा योग्य पद्धतींचा अवलंब करून अयशस्वी होणे अनेक पटींनी चांगले!
  • तुमचे जीवन खूप मौल्यवान आणि सुंदर आहे, ते निरुपयोगी गोष्टींवर वाया घालवू नका!
  • कोणतेही काम करण्यापूर्वी आपल्याला ते अवघडच वाटते!
  • यशस्वी लोकांमध्ये त्यांच्या निर्णयाने जग बदलण्याची ताकद असते आणि अयशस्वी लोक जगाच्या भितीने स्वतःचे निर्णय बदलतात!
  • खोटं बोलणारा जेव्हा खर बोलतो, तेव्हा त्याच्यावर कोणही विश्वास ठेवत नाही
  • स्वत: विचार करून निर्णय घ्या, आणि जे योग्य वाटत तेच करा
  • स्वतःला ओळखणं ही यशाची यशाची खरी गुरुकिल्ली आहे
  • आयुष्य सुंदर होण्यासाठी, आयुष्य सहज आणि सोपं जगायला शिका

नकारात्मक विचार करणाऱ्यांना त्याचे वाईट परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. कारण अशा लोकांच्या आयुष्यात चांगले, हितकारक कधीच घडत नाही. त्यामुळे चांगले विचार ही आताच्या काळाची गरज आहे.

  • श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे व्यक्तीमत्व!
  • भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे!
  • परिस्थितीच्या हातातली कधीच कठ पुतळी बनू नका, कारण परिस्थितीत बदलण्याची ताकद तुमच्यात आहे!
  • ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार करु नका कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेव्हढे अंतर आहे ,तेव्हढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट आहे
  • आयुष्यात आपण किती वेळा हरला आहे काही फरक पडत नाही कारण तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे!
  • जे लोक हटके आहेत ते इतिहास रचतात हुशार लोक त्यांच्याबद्दलच वाचतात!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे 100 प्रेरणादायी सुविचार प्रत्येकाने वाचायलाच हवे…

???? ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजन! या बातम्यांसाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये नक्की Add व्हा ???? https://chat.whatsapp.com/FT9G2GTaGLm4DsImkvflms

    For more updates, be socially connected with us on – Instagram, Twitter, Facebook