आयुष्य जगत असताना सोबतीला फक्त विचार असुन चालत नाही.तर ते विचार सुंदर अर्थात सुविचार असावे लागतात. ज्याच्या जवळ सुंदर विचार सुविचार आहेत.तो कधीही एकटा नसतो.आज आपण असेच काही सुंदर सुविचार वाचणार आहोत.
- माणसाने नेहमी असा विचार करू नये की तो त्याच्या आयुष्यात किती आनंदी आहे. त्यापेक्षा त्या व्यक्तीमुळे इतरांना किती आनंद होतो याचा विचार करायला हवा.
- जोपर्यंत आपण कोणतेही काम करण्याचा प्रयत्न करत नाही, जोपर्यंत आपल्याला ते काम अशक्य वाटतं.
- ध्येयात यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्वाचे आहे.
- माणसाने नेहमी सावली आणि आरशा सारखी मैत्री करावी. कारण सावली तुमची साथ कधीच सोडत नाही आणि आरसा कधीही खोटं बोलत नाही.
- जर एखादी व्यक्ती गरजेच्या वेळीच तुमची आठवण काढत असेल तर त्याबद्दल वाईट विचार करू नका, कारण अंधार पडल्यावरच दिव्याचीच आठवण येते.
- प्रेम हा असा अनुभव आहे जो माणसाला कधीही हार मानू देत नाही. आणि द्वेष हा असा अनुभव आहे जो माणसाला कधीही जिंकू देत नाही.
- शहाणा माणूस स्वतः चुका करत नाही, उलट, तो इतरांच्या चुकांमधून सर्व काही शिकतो.
- माणसाने नेहमी संधी शोधू नये, कारण आज जी आहे ती उत्तम संधी आहे.
- चुकीच्या मार्गाने यशस्वी होण्यापेक्षा योग्य पद्धतींचा अवलंब करून अयशस्वी होणे अनेक पटींनी चांगले!
- तुमचे जीवन खूप मौल्यवान आणि सुंदर आहे, ते निरुपयोगी गोष्टींवर वाया घालवू नका!
- कोणतेही काम करण्यापूर्वी आपल्याला ते अवघडच वाटते!
- यशस्वी लोकांमध्ये त्यांच्या निर्णयाने जग बदलण्याची ताकद असते आणि अयशस्वी लोक जगाच्या भितीने स्वतःचे निर्णय बदलतात!
- खोटं बोलणारा जेव्हा खर बोलतो, तेव्हा त्याच्यावर कोणही विश्वास ठेवत नाही
- स्वत: विचार करून निर्णय घ्या, आणि जे योग्य वाटत तेच करा
- स्वतःला ओळखणं ही यशाची यशाची खरी गुरुकिल्ली आहे
- आयुष्य सुंदर होण्यासाठी, आयुष्य सहज आणि सोपं जगायला शिका