‘ग्रेट ग्रँड मस्ती’ फेम अभिनेत्रीचा ‘आप’मध्ये प्रवेश

WhatsApp Group

बॉलिवूड चित्रपटांमध्ये वेगळ्या शैलीसाठी ओळखली जाणारी कंगना शर्मा आता राजकारणात उतरली आहे. इंडस्ट्रीत हिट न होता ती आता राजकारणात वर्चस्व गाजवण्याच्या तयारीत आहे. नुकतीच अशी घोषणा करण्यात आली आहे की कंगना शर्मा आता ‘आप’ अर्थात आम आदमी पार्टीमध्ये सामील झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अभिनेत्रीचे फोटो देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले आहेत. अभिनयाच्या दुनियेत आपली वेगळी शैली दाखवल्यानंतर आता कंगना शर्माने राजकारणाची वाटचाल सुरू केली आहे.

कंगना शर्मा ही हरियाणवी अभिनेत्री आहे. अभिनयापूर्वी ती मॉडेलिंग करायची आणि त्यानंतर तिने सिनेसृष्टीत आपलं नशीब आजमावलं. कंगनाने ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ (Great Grand Masti) या चित्रपटामधून पदार्पण केलं होतं, पण हा चित्रपट पडद्यावर फार काही करु शकला नाही.