
आता पाऊस सुरु झाल्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी ग्रामीण भागामध्ये मात्र लोकांना काही समस्यांना सामोरं जावं लागत आहे. ग्रामीण भागात पावसाळ्यात विषारी सापांचं (Snake) संकट पाहायला मिळतं. अनेकदा विषारी साप घरांमध्ये शिरून अडचणीच्या भागात लपून राहतात. यामुळे ग्रामीण भागातील लोकांना सापांपासून काळजी घ्यावी लागते. सापाच्या भीतीनं अनेकांची तर झोपचं उडते.
अनेकदा साप आढळल्यावर लोक सर्प मित्रांना बोलावून सापाची आणि गावकऱ्यांची सुटका करुन घेतात. सामान्य माणसं सापाच्या जवळ जाण्यापासून खूप घाबरतात. साप चावण्याची भीती असते. विषारी साप चावल्यामुळे मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक सापापासून दूरच पळतात.
पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चक्क एक आजी सापाला पकडून दूर फेकताना दिसत आहेत. हे ऐकल्यावर तुम्हालाही विश्वास बसणार नाही. त्यासाठी तुम्हीही हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहू शकता.
View this post on Instagram
नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये एक वृद्ध महिला हातांनी विषारी साप पकडून घरातून बाहेर काढताना दिसत आहे.