राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देणार राजीनामा, पीएम मोदींकडे व्यक्त केली इच्छा

WhatsApp Group

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कोश्यारी यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींच्या नुकत्याच झालेल्या मुंबई भेटीदरम्यान त्यांनी ही बाब पंतप्रधानांपर्यंत पोहोचवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावरून राजकीय वादंग उठल्यानंतर कोश्यारी हे पद सोडणार असल्याची चर्चा होती.  राज्यपाल कोश्यारी यांनी ट्विट केले की, ‘माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई भेटीत मी माझी इच्छा त्यांना कळवली आहे. मी पंतप्रधान मोदींना सांगितले आहे की मला सर्व राजकीय जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे. मला माझे उर्वरित आयुष्य वाचन, लेखन आणि इतर कार्यात घालवायचे आहे.

कोश्यारी यांनी ट्विट करून राज्यपालपदावरून दूर जाण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. कोश्यारी यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘महाराष्ट्रासारख्या महान राज्याचा राज्य सेवक किंवा राज्यपाल म्हणून काम करणे ही माझ्यासाठी खूप सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्र ही साधू, समाजसेवक आणि शूर योद्ध्यांची भूमी आहे. तीन वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रातील जनतेकडून मला मिळालेले प्रेम आणि आदर मी कधीही विसरू शकत नाही.

कोश्यारी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या वक्तव्यामुळे वादात सापडले होते. राज्यपाल कोश्यारी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील प्रतिक असल्याचे म्हटले होते.