मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

WhatsApp Group

राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी bhagat singh koshyari यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे बातमी समोर आली आहे. कोश्यारी यांना मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येताच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. राज्यपालांना आज सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.