मोदींनी जनतेला दिलं दिवाळी गिफ्ट, पेट्रोल-डिझेलच्या दरात केली कपात

WhatsApp Group

नवी दिल्ली – दिवाळी दिवशी मोदी सरकारने जनतेला एक मोठी भेट दिली आहे. केंद्राकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठा दिलासा मिळाला असून पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 5 तर डिझेलवर 10 रुपयांनी कमी करण्यात आले आहे ( excise duty reduction on petrol and diesel ). गुरुवारपासून ( ५ नोव्हेंबर) हे नवीन दर लागू करण्यात येणार आहेत.

या बाबात माहिती देताना अर्थ मंत्रालयाने राज्यांना व्हॅट कमी करून ग्राहकांना अजून दिलासा द्यावा असं आवाहनही केलं आहे. केंद्राच्या या आवाहनाला राज्ये कशी प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सामन्य ग्राहकांसोबतच आगामी रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनाही यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.


गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या सातत्याने वाढत आहेत. जवळपास देशातील सर्वच राज्यांमध्ये पेट्रोलच्या किंमतीन शंभरी पार केली आहे. यावर अर्थ मंत्रालयाने सांगितले की, गेल्या काही दिवासांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या असल्याने भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत.