लता मंगेशकर यांच्या निधनानंतर मोदी सरकारने जाहीर केला २ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

WhatsApp Group

नवी दिल्ली – भारतरत्न लता मंगेशकर Lata Mangeshkar यांचे रविवारी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. सुमारे 29 दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. लताजींच्या निधनाबद्दल मोदी सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे 2 days of national mourning. यासोबतच पूर्ण राष्ट्रीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पाहा, लता मंगेशकर यांची अजरामर गाणी

लताजींच्या निधनाने सर्वांनाच दुःख झाले आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दिग्गज राजकारण्यांपासून ते अभिनेत्यांनीही शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

लता मंगेशकर जवळपास महिनाभर आजारी होत्या. 8 जानेवारीला लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच क्रॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लतादीदींनाही कोरोनासोबत न्यूमोनियाही झाला होता.