भारतीय नौसेना Indian Navy Jobs मध्ये लवकरच दहावी उत्तीर्णांच्या काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कुशल कारागीर (इलेक्ट्रिकल फिटर, इलेक्ट्रो प्लेटर, इंजिन फिटर, फाउंड्री, पॅटर्न मेकर, ICE फिटर, इन्स्ट्रुमेंट फिटर, मशीनिस्ट, मिलराइट फिटर, पेंटर, प्लेटर, शीट मेटल वर्कर, पाईप फिटर, रेफ आणि एसी फिटर, टेलर, वेल्डर, रेडर फिटर, रेडिओ फिटर , रिगर, शिपराईट, लोहार, बॉयलर मेकर, सिव्हिल वर्क्स, कॉम्प्युटर फिटर, इलेक्ट्रॉनिक फिटर, गायरो फिटर, मशिनरी कंट्रोल फिटर, सोनार फिटर, वेपन फिटर, हॉट इन्सुलेटर, शिप फिटर, जीटी फिटर, ICE फिटर क्रेन) या पदांसाठी ही भरती (10th passed jobs in Indian Navy) होतं आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचे आहे. या पदभरतीसाठी अर्जाची अर्जाची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती इंडियन नेव्हीच्या ऑफिशिअल वेबसाईटवर देण्यात येणार आहे.
-
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवार हा इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- तसेच उमेदवाराने दिलेल्या संबंधित ट्रेडमध्ये ITI मध्ये ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.
- तसेच उमेदवारांनी नेव्हल डॉकयार्ड्समधून ITI इंटर्नशिप पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे.
- किंवा उमेदवारांना लष्कर/नौदल/हवाई दलाच्या योग्य तांत्रिक शाखेत टेक्निकल विभागामध्ये किमान दोन वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी पदभरतीसाठीच्या सर्व अटी शर्थी पूर्ण केल्या असणे आवश्यक आहे.
-
ही कागदपत्रे आवश्यक
- Resume (बायोडेटा)
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
- अर्ज सुरु होण्याची तारीख – ऑफिशिअल वेबसाईटवर लवकरच जाहीर करण्यात येईल.
- या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.joinindiannavy.gov.in/ या लिंकवर क्लिक करा