New CDS Appointment: अनिल चौहान यांची भारताचे नवे CDS म्हणून नियुक्ती

WhatsApp Group

केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अनिल चौहान यांची नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केली आहे. बिपिन रावत यांच्यानंतर ते दुसरे सीडीएस असतील. 40 वर्षे लष्करात सेवा बजावलेले अनिल चौहान गेल्या वर्षीच निवृत्त झाले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हेलिकॉप्टर अपघातात देशातील पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर सीडीएसचे पद रिक्त होते.

संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, ते भारत सरकारच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी आपल्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक कमांड सांभाळल्या आहेत. त्यांना जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील बंडखोरीविरोधी कारवायांचाही मोठा अनुभव आहे.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा