Video: बिग बॉस 16 मधील स्पर्धक Gori Nagoriनं वाळवंटात केला जबरदस्त डान्स

WhatsApp Group

Gori Nagori Dance Video: बिग बॉस 16 ची स्पर्धक गोरी नागोरी तिच्या आपल्या स्टाईलने इंटरनेटवर सर्वांची मनं जिंकत आहे. हरियाणवी डान्सरने तिचा व्हिडिओ इंटरनेटवर पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती लेहेंगा चोली परिधान करून वाळवंटात तिच्या देसी स्टाईलमध्ये नाचताना दिसत आहे. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे.

व्हिडिओमध्ये निळ्या रंगाची लेहेंगा चोली परिधान केलेली गोरी नागोरी मस्त कंबर हलवत डान्स करत आहे. गोरी नागोरीच्या या व्हिडिओवर लोक जोरदार कमेंट करत आहेत आणि काहीजण तिला ट्रोलही करत आहेत. लग्नात बेली डान्स करून Nora Fatehiनं केली ‘आग’, पहा व्हिडिओ

गोरी नागोरीचे खरे नाव तस्लिमा बानो आहे आणि ती मुस्लिम कुटुंबातील आहे. तिच्या प्रियकराचे नाव सनी चौधरी आहे. सनी चौधरी एक अभिनेता, निर्माता आणि गायक आहे. अनेक व्हिडिओ आणि फोटोंमध्ये गोरी नागोरी आणि सनी यांची लव्ह केमिस्ट्री दिसत आहे, जी लोकांना खूप आवडते. गोरी नागोरी लहानपणापासूनच नृत्य करत असून तिला शकीरासारखी डान्सर व्हायचं आहे. Video: शिल्पा शेट्टीचा डान्स पाहून नेटकरी घायाळ, पुन्हा पुन्हा पाहाल तिचा जबरदस्त डान्स!

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा