ओबीसी आरक्षणाची खरी हत्या पवारांनी केली आहे – गोपीचंद पडळकर

WhatsApp Group

पंढरपूर – पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

दरम्यान आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर (Sharad Pawar ) निशाणा साधला आहे. पवारांनी संस्कृती वर बोलू नये. पवारांची संस्कृती शिकला तर महाराष्ट्र मातीत जाईल. पवारांना ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचं नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणाची खरी हत्या पवारांनी केली आहे, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, काँग्रेस फक्त वसुली करण्यामध्ये मशगुल आहे, त्याचे मंत्री परदेशात गेले आहेत. त्यांची अवस्था ना घर का ना घट का अशी झाली आहे. जेलमध्ये जाण्यापेक्षा त्यांना राज गादी मिळाली आहे. झोपायला बंगले मिळाले आहेत, म्हणत पडळकरांनी काँग्रेस मंत्र्यावर टीका केली. ओबीसी, मराठा यांच्या आरक्षणा विषयी काही देणे घेणे नाही, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला.