
ज्याप्रमाणे जीवनात प्रत्येक गोष्ट महत्वाची असते त्याच प्रमाणे आणि त्यापैकी एक गोष्ट म्हणजे मोटिवेशन, कधी कधी आपण कठीण परिस्थितीचा सामना करताना हतबल होऊन लगेच हार मानतो पण अश्या परिस्थिती मध्ये जर आपल्याला उत्साह निर्माण करणारे काही विचार कानावर पडले तर किंवा आपल्या वाचनात काही उत्साह पूर्वक विचार आलेत तर.
आपण हार न मानता एखादी गोष्ट करण्यासाठी आपले प्राण पणाला लावतो. आणि त्या कार्याला पूर्णत्वास घेऊन जातो, जीवनात उत्साह खूप महत्वपूर्ण असतो, कारण उत्साहामुळे आपल्या जीवनात आपण कोणतेही कार्य करण्यास प्रवृत्त होतो. जीवनात उत्साह असणे खूप आवश्यक आहे. मग ते जीवनातील कोणतेही कार्य का असेना.
- विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
- शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.
- आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
- न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.
- जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
- मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.
- जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.
एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला सकारात्मक विचार प्रवृत्त करत असतात आणि या सकारात्मक विचारांमुळे च तर आपल्यात उत्साह निर्माण होतो. आणि या उत्साहाच्या बळावर आपण एखादे अशक्य वाटणारे कार्य सुध्दा पूर्ण करतो. जीवनात उत्साह जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत माणसाला कोणत्याच गोष्टीची भीती राहत नाही, तो त्या उत्साहाच्या जोरावर जीवनात खूप मोठी कामगिरी पूर्ण करतो. कारण एका दृष्टिकोनातून पाहिले असता माणसाचे जीवन हे आशा आकांक्षांवर अवलंबून आहे जीवनात आशा असणे खूप महत्वाचे आहे. कधीही हार न मानता समोर चालत राहणे म्हणजेच आयुष्य होय.
- बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.
- जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे, हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.
- शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.
- खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”
- स्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.
- आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो, त्याला कुणीही हरवू शकत नाही .
- नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.
हेही वाचा
- राधा आणि कृष्णाचे लग्न का झाले नाही? वाचा…
- आत्तापर्यंत फक्त 5 महिलांनाच मिळाला आहे भारतरत्न पुरस्कार, जाणून घ्या भारतरत्न मिळवणारी पहिली महिला कोण?
- या 5 प्रकारे वापरा क्रेडिट कार्ड, कधीही होणार नाही दंड, होईल फक्त फायदाच!
आपल्याला जीवनात कधी हताश,उदास, निराश न होता समोर चालत राहणे हा आयुष्याचा नियम आहे, आणि जो या नियमांचं पालन करत आयुष्य जगतो त्याला जीवनात कमी प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागतो. आयुष्यात एका ठिकाणी कधीही अडकून न राहता नेहमी चालत राहावे ज्याप्रमाणे पाणी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहत राहते, तेच पाणी जर एका ठिकाणांवर थांबले तर त्या पाण्यात जीव जंतू निर्माण होऊन ते पाणी खराब होते.
- प्रामाणिकपणा हि शिकवण्याची बाब नाही, तर तो रक्तातच असावा लागतो, त्यात टक्केवारी नसते ,तो असतो किंवा नसतो.
- कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
- “यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इछा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे”.
- खऱ्या विद्यार्थ्यांला कधीच सुट्टी नसते, सुट्टी हि त्याच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते.
- ज्याला संधि मिलते तो नशीबवान. जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान. आणि जो संधिचे सोने करतो तो विजेता.
- आपल्या नियतीचे मालक बना परंतु परिस्थितीचे गुलाम होवू नका.
- स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.
ज्या व्यक्तीचे विचार सुंदर असतात, त्यांना कुठेही कधीही पराभूत केले जात नाही, यश हे निश्चित आहे. अफाट कष्ट, कर्म आणि योग्य अनुभव ज्ञानाशिवाय कोणीही यश प्राप्त करू शकत नाही. यश मिळविण्यासाठी आपले मन आणि विचारही शुद्ध असले पाहिजे आहेत.
- शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.
- खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”
- स्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.
- आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो, त्याला कुणीही हरवू शकत नाही .
- नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.
- खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.
- ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही, त्या इतरांसोबत करू नका.