
माणसाचं जगणं सुंदर हे त्याच्या विचारांनी होत असते. आपल्या पूर्वजांची नाव आपल्याला आठवत नसतील पण महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद अश्या महान व्यक्तिमत्वांची आठवण कायम ठेवली जाते. का असेल बर असे. कारण त्यांनी जिवंत पणी जगात सुंदर विचार आणि सकारात्मक विचार लोकांच्या मनावर कोरून निघून गेले. म्हणतात ना “मरावे परी कीर्ती रुपी उरावे”. बस त्याच प्रमाणे आपण शरीराने तर या संसाराला त्यागू पण चांगले विचार जर पेरून गेलो तर लोकांच्या मनात आपण नेहमीसाठी जिवंत राहू. जीवनाला आणखी सुंदर बनविण्यासाठी या लेखात सुध्दा आपल्याला बरेच अशे सुंदर सुविचार पाहायला मिळतील best marathi suvichar, जे आपल्याला आयुष्यात एक नवीन वळण देतील. तर चला पाहूया काही सुंदर विचार..
1) आपण समोर बघतो कि मागे, या वर अनेकदा सुख दुःख अवलंबून असते.
2) जिभेचं वजन कमी असलं, तरी तिचा तोल सांभाळणं कठीण असते.
3) नेहमी चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्या सोबत असतील, तर आयुष्यात तुम्ही एकटे राहू शकत नाही.
4) ज्यांच्या डोळ्यात लहान लहान कारणांमुळे पाणी येतं, ती लोकं कमजोर नाही तर साफ हृदयाची असतात.
5) आरसा आणि मन दोन्ही सारखेच फरक इतकाच आरश्यात सगळे दिसतात आणि मनात फ़क्त आपलेच दिसतात.
6) प्रत्येकाच्या हृदयाचं Lock आपण उघडु शकतो फक्त आपल्याकडे माणुस KEY पाहीजे.
7) चूक हि आयुष्याचं एक Page आहे, पण “Relation” म्हणजे, आयुष्याचं “Book ” आहे.
8) सर्वांना सुखी ठेवणं आपल्या हाती नसलं, तरी आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे.
9) देव आपल्याला देतो तो चेहरा,आणि आपण निर्माण करतो ती ओळख.
10) माणूस काही गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल, पण तो माणुसकीमध्ये, पक्का असला पाहिजे.
11) बोलतांना शब्द जपावेत, कारण ते हृदय चिरू शकतात.
12) शाकडे जाणारा मार्ग हा के आत्मविश्वासामुळेच उघडतो.
13) मनाचे नाकारावे आणि विवेकाचे ऐकावे.
14) मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही.
15) भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचे फुल कशासाठी जगायचे हे शिकवते.
16) मनाची परिक्षा डोळ्यानी होते, तर डोळ्याची परिक्षा मनाने होते.
17) न हरता, न थकता, न थांबता, प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिब सुद्धा हरत नाही.
18) दुसऱ्या माणसाला मदत करणं म्हणजे स्वतःचं बळ अजमावणं.
19) आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत.
20) तुम्ही माझ्या संघर्षाच्या काळात माझ्या बरोबर नसाल, तर मी तुम्हाला माझ्या यशात सामील करून घेईन.
21) मला आता नवीन टिकाकारांची गरज आहे कारण आधीचे टीकाकार माझ्या प्रेमात आहेत.
22) रिकामी पाकीट कधीच तुमच्या यशाच्या आड येत नाहीत जेवढे रिकामी डोके आणि रिकामी मन यशात अडसर बनते.
23) नशीब हातात येत नाही, हाताला तुमच्या नशीबाकडे नेणे गरजेचे असते.
24) संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.