सर्वश्रेष्ठ सुंदर सुविचार marathi suvichar

WhatsApp Group

1) सत्य हे सूर्यासारखे स्वयंप्रकाशी आहे जसा सूर्य झाकला जात नाही तसेच सत्यदेखील झाकले जात नाही.
2) मोठेपणा येण्यासाठी आधी (कष्ट) परिश्रम सोसावे लागतात.
3) प्रयत्न हाच परमेश्वर, प्रयत्न हा जीवन मंदिराचा कळस.
4) सत्य झाकले जाईल पण मालवले कधीच जाणार नाही.
5)स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.
6)परिश्रम हे जीवनाच्या साफल्याचे रहस्य आहे.

7) संकट हा सत्याकडे जाण्याचा पहिला मार्ग आहे.
8) जिव्हाळ्याचा जेथे संबंध असतो तेथे तर्कास वाव नसतो.
9) जो स्वत:ला न जाणता दुस-याला ओळखायला निघतो तो अपयशाकडे नेणारी यात्रा करीत असतो.
10) निर्भय कृती हीच खरी प्रार्थना, बाकीच्या अर्ज, विनंत्या म्हणजे केवळ हवेचे बुडबुडे.
11) उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते झोपून स्वप्न पाहत राहा, किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा.
12)सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.

13) तूमच्या धेय्यावरून जग तुम्हाला ओळखत असतं.
14) प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्क्की गाढतात.
15) मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.
16) यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजुन एकदा प्रयत्न करने होय.
17)नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल.
18) गणितात कच्चे असाल तरी चालेल पण हिशोबात पक्के रहा.

वाचा – सर्वश्रेष्ठ कृतज्ञता मराठी सुविचार