
आज आम्ही येथे मराठी सुविचार संग्रह घेऊन आलो आहोत. सुविचार मराठी तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणतात. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन उंची गाठू शकता.
1 | अवघड क्षणीही न डगमगता जो अचूक निर्णय घेतो तोच जीवनाच्या लढाईत जिंकतो. |
2 | जीवनरूपी पटावर माणसाची प्यादी हलवणारा सूत्रधार परमेश्वर बसला आहे. |
3 | माणूस दुसऱ्याला कितीही फसविणारा असला तरी आपल्या मनाला तो कधीच फसवू शकत नाही. |
4 | मनाच्याही अंतर्मनात चाललेली उलाढाल माणूस निद्रावस्थेत पहात असतो. |
5 | माणसाच्या पापपुण्याचा हिशोब त्याला परमेश्वराच्या दरबारात चुकता करावाच लागतो. |
6 | सत्य हे कटू असते पण शेवटी ते पचवावेच लागते. |
7 | दुर्जन कितीही मातला तरी अखेर त्याला पापाचे शंभर अपराध घडल्यावर केलेल्या कृत्याचा भोग भोगावाच लागतो. |
8 | केल्या कर्माची फळे माणूस याच जन्मी भोगत असतो पण ते बघायला सोसणारा असतोच असे नाही. |
9 | पोट हे माणसाला काहीही करायला भाग पाडते. |
10 | गरीबांच्या जीवावर श्रीमंतांची पोळी भाजत असते. |
काहीही साध्य करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टींची आवश्यकता आहे, पहिले संकल्प आणि दुसरे म्हणजे कधीही न संपणारे धैर्य.
11 | स्त्री पुरुषाची दासी किंवा बटीक नाही तर ती गृहदेवता आहे. |
12 | संतुट स्त्री हेच घराचे सौभाग्य. स्वच्छता हीच खरी दौलत. समाधान हेच घराचे वैभव. |
13 | पाठीमागून वार करणाऱ्या शत्रूपेक्षा पुढून वार करणारा शत्रू परवडला. |
14 | कळीचे फुल उमलले की मध चाखायला भुंगे जमतात. |
15 | दुधापेक्षा दुधावरच्या साईला जास्त जपावे लागते. |
16 | बिंदूचा जन्म जसा विरण्यासाठी असतो तसे त्यागी माणसाचे जीवन विरक्तीत असते. |
17 | हिंदुधर्म संस्कृती ही एक सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे, तिच्यावरच सर्व जगाची पाळेमुळे पोसली आहेत. . |
18 | घटका गेली पळे गेली तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाना! |
19 | क्षणैक राग हा आयुष्यभर पश्चाताप करावयास लावतो. |
20 | क्षणैक मोह हा आयुष्यभर पश्चाताप करावयास लावतो. |
ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करु नका कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेव्हढे अंतर आहे ,तेव्हढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट आहे.
21 | तुमच्या महत्त्वाकांक्षेला किल्ली द्या, पराक्रम आपोआप होतो. |
22 | महत्त्वाकांक्षा नेहमी चांगली ठेवा. |
23 | आपल्या महत्त्वाकांक्षेने जर एखाद्याचे नुकसान होत असले तर ती महत्त्वाकांक्षा नव्हे, राक्षसी लालसा होय. |
24 | मरणाचा मार्ग मोक्षाच्या मैदानातून जातो. |
25 | फुल फुलले की त्याला स्पर्श व हुंगण्याचा मोह हा होतोच. |
26 | पहाडाशी टक्कर देताना पहाड फुटला पाहिजे, डोके नव्हे. |
27 | मनात किंतू आला की तो विंचू म्हणून ठेचावा. |
28 | बकरी होऊन शंभर वर्ष जगण्यापेक्षा वाघ होऊन एक वर्ष जगा. |
29 | कला ही नैसर्गिक देणगी असते तिचा विकास करणे आपल्या हातात असते. |
30 | विद्या विनयेन शोभते. |
जीवनात कोणतेही काम वेळेत केले तर त्यापासून मिळणारे फळ हे नेहमीच चांगलं असते. संत कबीर दास यांनी म्हटलं आहे की, ‘कल करे सो आज कर आज करे सो अब’. या अनुषंगाने आपण वागून आपली सर्व कामे याचं प्रकारे केली तर भविष्यात कुठलीच चिंता करायचं काम पडणार नाही.
31 | तहानलेल्याला विहीरीवर नेले तर तो पाणी पितो. पण ज्याला तहानच लागली नाही त्याला जर विहीरीवर नेले तर तो कोरडाच परत येतो. |
32 | स्वप्न ही रंगविण्यासाठी असतात कारण स्वप्न सत्यात साकारणे फार कठीण असते. |
33 | यशाचा डोंगर गाठायचा असेल तर जिद्द आणि चिकाटी सोडू नका. |
34 | स्वप्नरंजन करणे म्हणजे मृगजळ बघणे. |
35 | जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. |
36 | माणसाच्या जिवनाच्या पतंगाची दोरी नियतीच्या हातात असते. |
37 | घरात अपशब्द बोलू नका वास्तू तथास्तू म्हणत असते. |
38 | घरात वाढणारी मुलगी व दारात येणारी चिमणी या दोघीही सारख्या असतात. चिमणी दाणे टिपून जाते तर मुलगी सासरी जाते. |
39 | प्रत्येकजण आपापले नशिब घेऊन येत असतो. |
40 | प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे. |