जीवनातील आनंदाची जाणीव करून देणारे सुंदर सुविचार Motivational Quotes

WhatsApp Group

आपले जीवन ही देवाने आपल्याला दिलेली एक अनमोल भेट आहे. जर आपण आपले आयुष्य दु: खी मनाने किंवा अस्वस्थ होऊन व्यतीत करू असू तर आपण देवानं दिलेल्या या अनमोल भेटीकडे दुर्लक्ष करत आहोत. म्हणूनच, जीवनातील परिस्थिती कशीही असो आणि आपल्याला कितीही अडचणींचा सामना करावा लागला तरी आपण नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण जीवनाचे दुसरे नावच ‘संघर्ष’ आहे.

  • आयुष्य जगून समजते; केवळ ऎकून , वाचून , बघून समजत नाही.
  • आयुष्य हि फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याल ठाऊक नसत पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि
  • कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते .
  • आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
  • आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका, त्याने जगणे बाजूला राहून जाते. जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार? सगळे इथेच सोडून जायचे हे.
  • आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबती कुणाची तरी हवी असते पण असे का घडते कि जेव्हा ती व्यक्ती हवी असते … तेव्हाच ते आपल्याजवळ नसते ?
  • आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.
  • आयुष्यात अनेक संधी चालून येतात. आपण जर का त्या पकडल्या नाहीत तर दोष आपला आहे. या संधी पकडण्यासाठी आपण नेहमी तयार असलं पाहिजे. नंतर दैवाला दोष देण्यात काय अर्थ आहे ?
  • आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.
  • आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.
  • आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.
  • आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.

सुविचार वाचल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी सोप्या होत जातात. इतकेच नाही तर हे प्रेरणादायी सुविचार वाचल्यानंतर आपली जीवनशैली देखील बदलते. हे असे सुविचार वाचल्यामुळे आपण नशिबापेक्षा आपल्या परिश्रमांवर अधिक विश्वास ठेवतो.

  • आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
  • आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.
  • आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू जिंकायची सवयच आहे . . . हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत !!!
  • आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
  • आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
  • आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.
  • आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
  • आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
  • एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.
  • एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.
  • कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हाव लागतं. दुःखाचे काटे टोचतानाही खळखळुन हसावं लागतं.. जीवन यालाच म्हणायच असतं.. दुःख असुनही
  • दाखवायचं नसतं.. अश्रुनीँ भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असतं..:
  • कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत. ते मिळवावे लागतात.

तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सर्व आनंद मिळवू इच्छित असाल तर तुम्हाला सुविचार नेहमी वाचले पाहिजे. हे आपल्या मनामध्ये उत्साह आणि प्रोत्साहन भरतात. त्यांच्या मदतीने आपण कोणतेही कठीण काम सोपे करू शकतो.

  • खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेवून येतात… पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात…
  • आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
  • छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
  • जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.
  • जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.
  • जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसर्‍याला सांभाळत न्यावं लागतं.
  • ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदा कदाचित समजा ती उभी
  • राहिलीच, तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत…
  • तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
  • तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
  • आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
  • तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते
  • तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

यशस्वी लोक आणि अयशस्वी लोकांमध्ये छोटासा फरक आहे. जगातील सर्व यशस्वी लोकांच्या यशाचे एकच रहस्य आहे, निरंतर मेहनत आणि धैर्य. जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही आहे जी मनुष्य साध्य करू शकत नाही फक्त आपण जे काही ध्येय स्वतःसाठी पाहत आहोत ते साध्य करण्यासाठी आपण कठोर परिश्रम केले पाहिजे. 

  • नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.
  • परिश्रम हे जीवनाच्या साफल्याचे रहस्य आहे.
  • पायाला पाणी न लागता पण कुणी समुद्र पार करू शकतो पण माणसाचे आयुष्य अश्रू शिवाय पार करता येत नाही यालाच खरे आयुश्य म्हणतात
  • पैशाशिवाय जीवनात अर्थ नाही, एक अर्थ असला म्हणजे जीवनात पुष्कळ अर्थ असतात.
  • भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.
  • माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.
  • माणसाला “बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात …पण “काय बोलावे”हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते
  • लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.
  • विचाराची संपत्ती ही माणसाच्या जीवनातील कामधेनू आहे.
  • शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
  • संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
  • सज्जन माणूस म्हणून जन्माला येणे हा योगा-योग आहे, परंतु सज्जन म्हणून मरणे, ही आयुष्य भराची कमाई आहे.
  • समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.

जीवनाच्या या कठीण प्रवासात आपल्यातील खूप जण निराश होतात किव्हा आजारी पडत असतात हे Marathi Motivational Quotes तुम्हाला एक नवीन ऊर्जा देईल तसेच तुम्हाला जीवनाच्या या प्रवासात सकारात्मक विचार करायची शक्ती देईल.

  • सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे : पाप होईल इतके कमाउ नये , आजारी पडू इतके खाऊ नये , कर्ज होईल इतके खर्चू नये , आणि भांडण होईल इतके बोलू नये .
  • सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
  • “जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही.”
  • वेळ हा एखाद्या वाहत्या नदी सारखा असतो. कारण एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही.
  • कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी पण परत येत नाही. असेच वेळेचे पण आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा…
  • आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्यात जगण्याची कारण बदलतात
  • जीवनाचे दोन नियम आहेत, बहरा फुलांसारखं, आणी पसरा सुगंधासारखं..कुणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते आणि कुणाकडून प्रेम मिळवणं सर्वात मोठा सन्मान असतो…..!
  • गरजेनुसार जीवन जगा इच्छेनुसार नाही, कारण गरज तर गरीबांची पूर्ण होते, इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते…
  • नशीबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका. जीवनात कधी उदास होऊ नका . नका ठेवू विश्वास हातावरच्या रेषांवर. कारण भविष्य तर त्यांचंही असतं, ज्यांचे हातच नसतात़
  • सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही.. इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही.. जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही
  • फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटुन तर सर्वजण आंनदी होतात. पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे
  • जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.
  • इतरांशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं पण स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होवू शकता.