
Police Bharati 2022 : पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आहे. राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आजपासून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. पोलिस दलातील विविध जिल्ह्यातील तब्बल 18 हजार 331 जागांसाठी ही भरती असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन टप्प्यात या जागा भरल्या जाणार आहे.
भरतीबद्दल तपशील
- शैक्षणिक पात्रता: बारावी उत्तीर्ण व चालक पदासाठी (LMV Driving License).
- वयोमर्यादा खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे.
- अर्जासाठी शुल्क : खुला प्रवर्ग- 450 रुपये व मागास प्रवर्ग- 350 रुपये
- वेतन 5,200 ते 20,200 रुपये (ग्रेड पे– 2,000रुपये.) विशेष भत्त्यासह 500 रुपये .