खुशखबर! महाराष्ट्रात 7 ते 8 जूनपर्यंत मान्सून दाखल होणार

WhatsApp Group

मे महिन्याच्या सुरुवातीपासून वाढत्या तापमानामुळे (Heat Wave) सर्वजण हैराण झाले आहेत. वाढत्या उकाड्यामुळे सर्वजण पावसाची (Rainfall) आतुरतेने वाट पाहत आहेत. अशामध्ये उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या महाराष्ट्रातील (Maharashtra Heat) जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस (Maharashtra Monsoon) दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 7 जून ते 8 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) देण्यात आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 7 जून ते 8 जूनपर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो. तर 12 जून ते 15 जून या कालावधीत संपूर्ण राज्यामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी देखील महाराष्ट्रात मान्सून दरवर्षीप्रमाणे पोहोचण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभाग पुणे येथील हवामान विभागाचे प्रमुख अनुराग कश्यपी यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, अंदमानमध्ये 16 मेपासून मान्सून पाऊस सुरू झाला आहे. केरळमध्ये मान्सून 27 मेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.