आज सप्टेंबर महिन्याची पहिली तारीख असून, तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात केली आहे. 19 KG व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरची किंमत 158 रुपयांनी कमी केली आहे, LPG ग्राहकांसाठी हा एक महत्त्वपूर्ण दिलासा आहे. नवीन किमती आजपासून लागू होतील आणि दिल्लीतील 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत 1,522 रुपये असेल.
दोन दिवसांपूर्वी सरकारने घरगुती सिलिंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी केल्या होत्या. एवढेच नाही तर 1 ऑगस्ट रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीही 100 रुपयांनी कमी केल्या होत्या. सणासुदीच्या महिन्यातच घट झाल्याने व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
After domestic LPG price reduction, commercial LPG prices cut by Rs 158
Read @ANI Story | https://t.co/W2I9BpShOQ#LPGCylinderPrice #LPGPrice #PMModi #RakshaBandhan pic.twitter.com/AEsJnzOdW0
— ANI Digital (@ani_digital) September 1, 2023
मंगळवारीच सरकारने 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 200 रुपयांनी कमी केली होती. मात्र, विरोधक या घोषणांना निवडणुकीशी संबंधित म्हणत हल्लाबोल करत आहेत. पण ते काहीही असले तरी गॅसच्या दरात कपात करून सर्वसामान्यांना फायदा होत आहे. या कपातीनंतर दिल्लीत एलपीजी घरगुती सिलिंडरची किंमत 900 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर कपातीपूर्वी 1700रुपयांना उपलब्ध होते. मात्र 1 सप्टेंबरपासून सिलिंडरची किंमत 1522.50 रुपयांवर गेली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
पेट्रोलियम कंपन्यांच्या मते, दिल्लीत कपातीनंतर 19 किलोचा सिलेंडर 1522.50 रुपयांना मिळेल. कोलकात्याबद्दल बोलायचे झाले तर सिलेंडरची किंमत 1636 रुपयांवर गेली आहे. सध्या मुंबईत त्याची किंमत 1640.50 रुपये होती, जी आता 1482 रुपयांवर आली आहे. त्याचवेळी दिल्लीला लागून असलेल्या नोएडा, गाझियाबाद, मेरठ आदी जिल्ह्यांमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1500 रुपयांवर पोहोचली आहे. विरोधकांनी याला आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा म्हटले आहे. मात्र, एलपीजीच्या दरात कपात झाल्याने सर्वसामान्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तसेच शासनाचे आभार मानले.