tiktok back in india भारतात पुन्हा एन्ट्री करू शकते tiktok

WhatsApp Group

tiktok back in india : TikTok च्या भारतीय फॅन्ससाठी यावर्षी चांगली बातमी येऊ शकते. एका अहवालामध्ये असे समोर आले आहे की, Short व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म TikTok ची मूळ कंपनी Bytedance भारतात परत येण्यासाठी नवीन भागीदारीवर काम करत आहे. २०२० मध्ये भारतात २५० हून अधिक चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. यामध्ये PUBG Mobile, Alibaba आणि TikTok सारख्या अत्यंत लोकप्रिय अॅप्सचा समावेश होता.


Krafton ने मे २०२१ मध्ये Battlegrounds Mobile India (BGMI) हा गेम लाँच केला होता. हा गेम PUBG Mobile ऐवजी भारतात आणण्यात आला आणि आता ByteDance एका नवीन भागीदारासह लोकप्रिय TikTok अॅप भारतात आणू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील भागीदारीसाठी Byte dance आणि हिरानंदानी समूह यांच्यात चर्चा सुरू आहे.

जर Tiktok ने भारतात पुन्हा एन्ट्री केली तर, कदाचित Tiktok ऐवजी नवीन नावाने लाँच केले जाईल. Tiktok ला भारत सरकारच्या नियमांचे रिटर्नसह पालन करावे लागेल आणि युजर्सचा डेटा देशाबाहेर नाही तर भारतात साठवावा लागेल. यावेळी टिकटॉकला Instagram Reels, Youtube Shorts, Snapchat, ShareChat, Moj, MX Takatak, Chingari सारख्या Apps ची टक्कर मिळेल.