Ganpati Special Train : गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

0
WhatsApp Group

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. गणेशोत्सवानिमित्त 156 विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. मुंबई, पनवेल, पुणे येथून रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी, मडगाव या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. 13 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत गाड्या धावतील. 27 जूनपासून बुकिंग सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे बुकिंग रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट किंवा अॅपवरून करता येईल. यासाठी विशेष शुल्क आकारण्यात येणार आहे. NTES अॅप किंवा www.enquiry.gov.in या वेबसाइटवरून विशेष गाड्यांचे थांबे आणि वेळेची माहिती मिळेल.

कोकणातील गणेशोत्सव