मुंबई – MPSC परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. राज्य सरकारने MPSC परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना एका वर्षाची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे परीक्षा होऊ न शकल्याने अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होणार याचा विचार करता दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाने हा निर्णय घेतला आहे.
MPSC परीक्षेबाबत विद्यार्थ्यांनी देखील मागणी केली होती, त्यानुससार राज्य सरकारने आता एक वर्षाची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. 19 नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असणाऱ्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यां मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारने MPSC परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला असून, ज्यांची वयोमर्याद ओलांडली आहे अश्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. दोन वर्ष कोरोनामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. त्यामुळे वयाची मर्यादा दोन वर्षांनी वाढवावी अशी मागणी केली होती. याबाबत राज्य मंत्रिमंडळाने चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक वर्ष मुदत वाढीस मान्यता दिली आहे. राज्यमंत्री, प्रशासन विभागाचे दत्ता भरणे यांच्याकडून ही माहिती सांगण्यात आली आहे.