राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी… 34 टक्के महागाई भत्ता लागू

WhatsApp Group

राज्यातील एसटी कर्मचारी गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवत असतानाच, राज्य सरकारने आज एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता जाहीर केला आहे. शिंदे-भाजप सरकारने हा निर्णय घेतला असून राज्य सरकारने एसटी महामंडळाला पत्र पाठवले आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय काही काळ प्रलंबित होता. या प्रस्तावित भत्त्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने एसटी कामगार संघटना आक्रमक झाल्या आणि त्यांचा निषेध करण्यात आला.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता मिळतो, तर एसटी कर्मचाऱ्यांना 28 टक्के भत्त्यावर समाधान मानावे लागते. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.