
मुंबई: दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर राज्य सरकाराने मोठी घोषणा केली आहे. शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचं दिवाळी पॅकेज देण्यात येणार आहे. केवळ शंभर रुपयांमध्ये दिवाळी पॅकेज मिळणार असून या पॅकेजमध्ये रवा, चणाडाळ, साखर आणि तेल (प्रत्येकी एक किलो) असणार आहे. दिवाळी पॅकेजचा फायदा राज्यातील 1 कोटी 70 लाख कुटुंबांना म्हणजेच 7 कोटी लोकांना याचालाभ मिळणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिंदे सरकारने हा निर्णय घेतला आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील फॉलो करा. Insidemarathi.com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा