Ration Card | रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता साडीही मोफत मिळणार
राज्यातील सर्व शासकीय रेशन दुकानांवर शिधापत्रिकाधारकांना साड्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
राज्यातील जनतेसाठी एक मोठी खूशखबर आहे, राज्यातील जनतेला आता रेशन कार्डवर मोफत रेशनसोबतच मोफत साडी मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाने कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या प्रत्येक कुटुंबाला सरकार एका वर्षात एक साडी मोफत देईल. राज्यातील सर्व शासकीय रेशन दुकानांवर शिधापत्रिकाधारकांना साड्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाची ही योजना 2023 ते 2028 या पाच वर्षांसाठी राबविण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या 24,58,747असून, या सर्व कार्डधारकांना वर्षभरातील एका ठराविक सणाच्या दिवशी सरकार एक साडी मोफत देणार आहे. महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे. त्यानुसार ही योजना सुरू करण्यामागे पिवळे शिधापत्रिकाधारकांचे म्हणजेच दारिद्र्यरेषेखालील लोकांचे जीवनमान सुधारणे हा आहे. शासनाच्या आदेशानुसार वस्त्रोद्योग विभागामार्फत अंत्योदय शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंबीयांना 5 वर्षांसाठी दरवर्षी एक साडी मोफत दिली जाणार आहे.
…@CMOMaharashtra has launched a ‘captive market’ scheme to provide one free sari per year to each family holding Antyodaya ration cards in the state.
A captive market is a market where consumers have very few choices, or even only one choice, for a particular product or service.… pic.twitter.com/TNDsjqt98S— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) November 10, 2023
या योजनेची राज्यात योग्य अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेंतर्गत गरीब लोकांना दिल्या जाणाऱ्या साड्या राज्य यंत्रमाग महामंडळ आणि एमएसएमई अंतर्गत नोंदणीकृत छोट्या कंपन्या बनवतील. यंत्रमाग महामंडळ या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, वाहतूक आणि साठवणूक यांसारख्या व्यवस्थेवरील खर्चाचे व्यवस्थापन करेल. लोकांना दिल्या जाणाऱ्या साड्यांच्या दर्जाची खात्री करण्याची जबाबदारीही या महामंडळाची असेल.