पुणे – पुण्यातून एक कोरोनासंदर्भातील (corona virus) आनंदाची बातमी समोर येत आहे. एकेकाळी कोरोनाने पुण्यामध्ये कहर केला होता. मात्र आता पुण्यात कोरोना व्हायरस पूर्णपणे आटोक्यात येताना दिसत आहे. पुण्यात आता एकही कोरोना रुग्ण व्हेंटिलेटर नाही आहे. तसेच ऑक्सिजनवर केवळ एकच रुग्ण असल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या 24 तासामध्ये पुण्यात फक्त 65 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच दिवसभरात 99 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर महत्वाचे म्हणजे पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही आहे. पुणे बाहेरही तशीच परिस्थिती आहे.
पुण्यात सध्या फक्त एकच कोरोनाबाधित रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहे. तसेच इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर आणि नॉन इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवरही एकही रुग्ण नाही आहे.